" स्नेहसंमेलनातून उलगडले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण"

26 Dec 2025 14:57:13

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
दिनांक 23 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी शिक्षण प्रसारक मंडळीच्या एस.पी.एम. इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
यंदाच्या स्नेहसंमेलनाचा विषय अभ्यास पूरक आणि अभ्यासपूर्ण असा होता- दृष्टी द पावर विदिन " यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण"2020 ( NEP 2020) मधील विविध पैलू उलगडण्यात आले .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंदे मातरम सार्थ शती जयंती समारंभ समितीचे कार्यवाह श्रीयुत संजय भंडारे सर, डॉक्टर अपर्णा मॉरिस ( मुख्याध्यापिका एस.पी.एम. पब्लिक स्कूल ) एस.पी.एम. शाळा समितीचे अध्यक्ष आणि मा. श्री. सुधीर काळकर सर उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भूत असलेली विविध कौशल्य विकसनासाठी शाळेत होत असणारे विविध उपक्रम, याबरोबरच अभ्यासाचे विषय विविध मनोरंजक अशा नृत्य, नाट्य, वादन, गायन, पथनाट्य या कार्यक्रमातून सादर केले होते. या सादरीकरणात पचनसंस्थेवर नाटक, मोबाईलचे दुष्परिणाम यावरील पथनाट्य, भाषेतील म्हणी विरामचिन्हे, वाक्प्रचार आणि मनोरंजक खेळ यावरील नाटके, मूल्यांवर आधारित गाणी इत्यादी सारखे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी व पर्यवेक्षिका  रिटा कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने झाली.
Powered By Sangraha 9.0