नवीन मराठी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

30 Dec 2025 17:43:13
 
   पुणे : बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. शाळेचे माजी विद्यार्थी आयटी कन्सल्टंट व्हाइस प्रेसिडेंट कौस्तुभ आगाशे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग, मुख्याध्यापिका हेमा जाधव, पालक संघ अध्यक्ष प्रणव जोशी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले करण्यात आले.
साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी खरा तो एकाची धर्म ही प्रार्थना सादर केली.
इयत्ता तिसरी चौथीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम या नृत्य प्रकारातून स्वागतगीत सादर केले.
शाळेतील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी कौस्तुभ आगाशे यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व बक्षीस न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रयत्न करून यशापर्यंत येण्यासाठी प्रोत्साहित केले.
तसेच विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना ही बक्षीस दिले जावे यासाठी स्वतःच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ शिक्षकांसाठी पुरस्कार सुरू केला.
शाळेतील ज्येष्ठ व अष्टपैलू शिक्षक धनंजय तळपे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षिका भाग्यश्री हजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
धनंजय तळपे, योगिता भावकर स्वप्न वाबळे यांनी आयोजन सहाय्य केले.
Powered By Sangraha 9.0