माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग
ज्ञानदेव माऊलींच्या नामात
रंगले सारे
पालखी अभंग नाटकात उमटले
संस्कार न्यारे
लहान चिमुकल्यांनी दाखवला
भक्तीचा ठेवा
स्नेहसंमेलन ठरले आनंदाचा सोहळा नवा🙏
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले.
श्री संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मशताब्दी निमित्त यावर्षीचा स्नेहसंमेलनाचा विषय संत ज्ञानेश्वर हा होता. स्नेहसंमेलनास
प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारे कलाकार तेजस बर्वे उपस्थित होते.
शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक
वासंतीताई बनकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू सर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक अपर्णाताई साने, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक प्रतिनिधी, शिक्षक, काका मावशी यांना तुळशीची माळ घालण्यात आली व नाम लावण्यात आले.
लहान चिमुकल्यांनी सादरीकरणातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा ठेवा सुंदररित्या मांडला. खेळ गट ते वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट गीते ,नृत्य व नाटक यांच्याद्वारे प्रभावीपणे सर्वांसमोर उलगडला.
या स्नेहसंमेलनातील विशेष आकर्षण ठरलेला समाधी सोहळा पाहताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू दाटून आले.
कनिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी मनोभावे सादर केलेला या समाधी सोहळ्यात सर्व संतांचे दर्शन घडविण्यात आले. तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वरांना आळविण्याचा भावपूर्ण प्रसंग दाखविण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्षा दांडेकर यांनी केले
कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला.