गरवारे प्रशालेची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी !

04 Dec 2025 16:19:44

garware
 
विबग्योर हायस्कूल, बालेवाडी येथे झालेल्या हँडबॉल स्पर्धेत गरवारे प्रशालेला मिळाले घवघवीत यश.....
      म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेने हँडबॉल स्पर्धेत घवघवीत यश मिळवत आपल्या क्रीडा परंपरेची उज्ज्वल छाप पाडली आहे. विबग्योर हायस्कूल, बालेवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक, तसेच १६ वर्षांखालील मुलांच्या गटानेही प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचा मान उंचावला.
      या विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक  रोहिदास भारमळ सर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या चिकाटी, संघभावना व मेहनतीचे कौतुक करत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घेण्याची प्रेरणा व शुभेच्छा दिल्या.
      क्रीडा शिक्षक धनराज प्रजापती सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत विजय संपादन केला.
      यावेळेस प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ सर उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम ,पर्यवेक्षिका
जयश्री शिंदे मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .
💐💐 “गरवारे प्रशालेच्या या चमकदार यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व प्रशालेचे मनःपूर्वक अभिनंदन!” 💐💐
Powered By Sangraha 9.0