क्रीडा महोत्सव उद्घाटन

04 Dec 2025 16:45:24
sports opening ceremony
   न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय खो- खो खेळाडू नंदन परांजपे, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्री.राज चौधरी, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
      प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी क्रीडा महोत्सवाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होते असे प्रास्ताविकातून सांगितले.
      प्रशालेतील गानवृंदाने क्रीडा गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले , पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर तसेच शाळेतील राज्यस्तरीय मल्लखांबपटू संपन्न शिंदे, राज्यस्तरीय खो खो पटू प्रणित सस्ते, अद्वैत सातपुते यांनी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले. सर्व विद्यार्थ्यांनी खेळातील हारजीत खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची प्रतिज्ञा घेतली.
      प्रमुख पाहुणे नंदन परांजपे यांनी अभ्यासाबरोबरच खेळाने शरीर बळकट करा व महाराष्ट्राचा देशाचा अभिमान बाळगून क्रीडा क्षेत्रामध्ये उज्ज्वल कामगिरी करा असा संदेश दिला.
      खेळ शिक्षणाचा प्रारंभ आहे खेळातून राष्ट्र निर्मितीची भावना निर्माण होते असा संदेश श्री. राज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर कोष्टी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हेमंत पाठक यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सर्व नियोजन क्रीडा प्रमुख रमेश शेलार यांनी केले. पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0