शाळा: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ – माध्यमिक विभाग
दिनांक: २९ नोव्हेंबर २०२५
२९ नोव्हेंबर २०२५ रोजी आमच्या शाळेच्या माध्यमिक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी तळजाई टेकडीवर शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ताजेतवाने करणाऱ्या मॉर्निंग वॉकने झाली. विद्यार्थ्यांनी स्वच्छ हवा, सुंदर निसर्ग आणि टेकडीचा शांत परिसर अनुभवला.
यानंतर शांत वातावरणात मेडिटेशन सत्र घेण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रता, मानसिक शांतता आणि ऊर्जा मिळाली.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरात आढळणारी विविध प्रकारची फुले व पाने गोळा केली. त्यांचा उपयोग करून मुलांनी सुंदर आणि कल्पक निसर्गचित्रे तयार केली, यातून त्यांची निरीक्षणशक्ती व कलात्मकता स्पष्ट दिसून आली.