वसंत येता, बहार आली
नवचैतन्याची किमया झाली
रंगरंगुल्या फुलाफुलांचे
रंग लेऊनी स्वप्नी जावे
लाल फुलांनी वृक्ष सजले
सोन फुलांचे सडे पसरले
हिरवे सारे रंग ल्याले
वसुंधरेचे रूप देखणे
फुला पानांनी तरू बहरले
कोकीळ सूर नभी गुंजले
निळ्या आकाशी उडती पाखरे
मधुगंध मनामनात पसरे
सजविले या वसुंधरेला
नटविले तिच्या लावण्याला
वसंत येता, बहार आली
नवचैतन्याची किमया झाली
शर्ती सचिन कुलकर्णी
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय