अटर का पटर

शिक्षण विवेक    17-Apr-2025
Total Views |




अटर का पटर 

मुलांना निखळ आनंद देणारी बालकविता : अटर का पटर

कवी विठ्ठल जाधव यांचा अटर का पटर हा बालकवितासंग्रह नुकताच इसाप प्रकाशनाने प्रसिद्ध केला असून या बालकविता मुलांच्या भाव जीवनाशी एकरूप होणाऱ्या आहेत. मुलांना निखळ आनंद देणाऱ्या या बालकविता असून त्या मुलांना सहज सुलभतेने आकलन होतील, अशा शब्दांत रचलेल्या आहेत. तसेच या बालकवितेला लय, नाद आणि ताल असल्यामुळे गोडवा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बालकविता मुलांना नक्कीच पसंत पडतील अशा आहेत. उदा., निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गावाचे नेटके नि समर्पक चित्र रेखाटताना कवी 'डोंगर' कवितेत लिहितो :

हिरवा डोंगर

डोंगरात गाव

गावात नदी

नदीत रस्ता

अशीच गंमतीशीर

'निवडणूक' ही बालकविता असून त्यामधून कवीने कल्पकतेने रंगवलेले कासव नि सशाच्या निवडणूकीचे चित्र मुलांना सुखावून टाकणारे आहे:

एकदा ससा राहिला निवडणूकीला उभा कासव होते विरोधी घेई ते पाण्यात सभा तसेच ही बालकविता मुलांना आनंद तर देतेच; पण त्यासोबतच त्यांना काही एक महत्त्वाचा बोधही अगदी नकळतपणे देताना दिसते. उदा., 'पैसा आणि मंत्र' कवितेतून कवी मुलांच्या मनावर वृक्षारोपणाचे महत्त्व तर बिंबवतोच पण त्यांना विचार करण्यासही प्रवृत्त करताना दिसतो :

मनीप्लॅन्ट लावून येतील का पैसे ? आपण आपले करू नये हसे याशिवाय या संग्रहातील काही कविता मुलांच्या मनातले विचार, त्यांच्या भावभावना आणि त्यांना कुतूहलापोटी पडणाऱ्या विविध प्रश्न अधोरेखित करणाऱ्या आहेत. उदा., 'शोध' या कवितेतून मुलांचे बालसुलभ कुतूहल आणि जिज्ञासेतून त्यांच्या मनात पडणारे प्रश्न व्यक्त करताना कवी म्हणतो :

देव, देव राहतो कुठे सांग आई, सांग आई चंद्रावरती, सूर्यावरती आभाळी की धरेवरती ?

अशीच मुलांच्या मनातली मोठ्या माणसांच्या वागण्याविषयीची ठसठस सांगा, 'मी काय करू?'

कवितेतून कवीने उजागर केली आहे.

हे म्हणती तिकडे जा ते म्हणती इकडे जा यांचं ऐकू की त्यांचं ऐकू सांगा, मी काय करू याशिवाय या बालकवितासंग्रहात आपल्याला मामाचा मळा भेटतो, नदी भेटते, डोलणारे बाळ भेटते, बोलणारे झाडदेखील भेटते आणि ते सारे बालमन खूश करून जातात आणि वाचकमनाला या कवितेचा लळा लागतो. था`ड क्यात कवी विठ्ठल जाय लिखित 'अटर का पट र 'मधील कवितेत मुलांच्या आचारविचार आणि भावभावनांचे देखणे नि साजेसे प्रतिबिंब पडले असून या बालकविता बालकांना त्यांच्या विश्वाचा पुनः प्रत्यय देणाऱ्या आहेत. या कवितांचे विषय मत्क्या जिव्हाळ्याचे असून आधी म्हटल्यानुसार मुलांना सह जोन त्यांचे आकलन होईल, अशा या सुंदर बालकविता आहेत. या बालकविता मुलांना कधी हसवतात, तर कधी एखादा सुंदर विचार अगदी सहजपणे त्यांच्या मनात रुजवून जातात. एकूणच रंजकतेमधून काही उपयुक्त असा बोध देणाऱ्या या बालकविता असून मलपृष्ठावर जेष्ठ बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणतात, त्याप्रमाणे 'या कविता मुलांना आवडतील आणि त्यांच्या ओठांवर त्या सहजतेने रुळतील, यात शंका नाही.' हेच कवी विठ्ठल जाधव यांच्या लेखणीचे यश आहे.

।। उमेश मोहिते ।।