चित्र

शिक्षण विवेक    29-Apr-2025
Total Views |


चित्र

 

चित्रांमध्ये काय पण वाट्टेल ते हो घडते !

सिंहाच्या आयाळातून एक फूल डोकावते !

 

हत्तीच्या पाठीवरती खुशाल बसते चिमणी !

वाघ वाजवतो ढोल, बेडूक म्हणतो गाणी !

 

चित्र पाहता पाहता सानी हरखून जाते !

पेंग्विनच्या पिल्लामध्ये स्वतःलाच बघते !

 

डॉ. नीलिमा गुंडी