अभ्यासाचे बारे फेब्रुवारी संपतानाच सुरू होतात घराघरात, परीक्षा, परीक्षा असा जप सुरू होतो. बघता बघता तोडी परीक्षा येते, अॅक्टिकल आणि मग लेखी! पण, परीक्षा जवळ आली कीच जास्त खेळावंसं वाटतं, सुट्टीत काय करायचं याचे प्हन्स सुरू होतात... आजीकडे जायचं का, का कुठे फिरायला जायचं, कोणता सिनेमा बघायचा, आईसक्रीम पार्टी कधी करायची, लहान मुलांची नाटकं कोणती बारायची... एक ना दोन... अनेक विचार डोक्यात घोंघावायला लागतात. अभ्यास करता करता हे विचार जास्त येऊ लागतात... का ते मलाही अजून कळलं नाहीये बुवा! आणि तेव्हाच पेपरमध्ये मुट्टीचे क्लास, समर कॅम्प, शिबिरं, हस्तकला शिका, डान्स शिका इ. जाहिरातींचा पूर येतो. रोज छोटे छोटे रंगीत पॅम्प्लेटस् घरी यायला लागतात आणि आयांची या सुट्टीत मुलाला/मुलीला या पैकी कुठे पाठवायचं याची गंभीर चर्चा सुरू होते!
आणि अखेर 'ती' येते !! सुट्टी!!! उन्हाळ्याची सुट्टी !!! जिची खूप आतुरतेने वाट बघत असतो आपण ती सुट्टी!!!!
आजी-आजोबांच्या, आई-बाबांच्या लहानपणीच्या आठवणी खूप मस्त असतात. मामाच्या गावाला गेल्याच्या, विहिरीत नाहीतर नदीवर पोहायला गेल्याच्या, बागेत हुंदडल्याच्या, मावस-मामे-चुलत-आते भावंडांशी खेळल्याच्या, आजीकडून गोष्टी ऐकल्याच्या, आंबे, फणस, करवंद, जांभळं, चिंचा, कैऱ्या, जांब अशा तोंडाला पाणी सुटणाऱ्या गोष्टी खाल्याच्या... मग.. आपल्याला फक्त समर कॅम्प का? असं खूप मुलांना वाटत असणार. पण, आता हळूहळू सगळेच नोकरी करत असल्याने एकमेकांकडे जाणं कमी होत चाललं, गावाला जाणं, महिनाभर राहणं याचं प्रमाणसुद्धा कमी झालं. आईला सुट्टी नसते, घरी कोणी नसतं म्हणून सुट्टीत सुद्धा पाळणाघर, शिबिर, कसले कसले क्लास यांचा आधार असतो.
त्यात बाईट काहीच नाही. सुट्टी - काहीही करायचं नाही, हे गणितच चूक आहे. सुट्टी खूप छान घालवण्यासाठी खूप काही करता येऊ शकतं. सगळ्यात आधी चार दिवस आय करून घ्या. उशिरा उठा. रोज शाळेला जाण्यासाठी लवकर उठतोच आपण. मग सुट्टी म्हणजे थोडं उशिरा उठणं एकदम चालेल. सुट्टी म्हणजे खेळ, हे तर आलच. पण, यावर्षी नवीन कोणता खेळ शिकायचा हे ठरवा. एखादा पत्त्यांचा नवा डाव, एखादा नवीन मैदानी खेळ, पोहायला शिकायला आता छान संधी असते.
मला आठवतं, मी लहान असताना हळूहळू सुट्टीत आपले छोटे कपडे धुणे आणि ते वाळत घालणे हे कधी शिकले माझं मलाच कळलं नाही. पण, पुढे होस्टेलला गेल्यावर त्याचा खूप उपयोग झाला. झाडांना पाणी घालता घालता हळूहळू कोणत्या झाडांना किती पाणी लागतं, कोणत्या झाडावर कोणते किडे असतात, अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. बाग असेल तर छोटे वाफे करून मेथी, कोथिंबीर पेरायचो आणि सकाळ-संध्याकाळ ती कशी वाढते, किती वाढली हे जाऊन बघायचो. आताही कुंडीत दा प्रयोग करू शकतोच.
सुट्टी आणि गोष्टीची पुस्तकं, कॉमिक्स नाही वाचले तर कसं चालेल? जवळची लायब्ररी शोधून दोन दिवसांत एक पुस्तक अशी कितीतरी छान छान पुस्तकं वाचून होतील आपली, नाही का ? लहान मुलांसाठी नाट्य शिबिरं असतात, नाटकं असतात. त्यातलं एखादं नक्की करा, बघा. खूप मज्जा येते. नवीन मित्रमैत्रिणी मिळतात आणि नवीन शिकायला मिळतच.
आईला/आजीला घरी थोडी मदत करायला तर इतकी मज्जा येते की विचारूच नका. जेवायला बसताना पानं घेणं, पाणी भरून घेणं, आपल्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं, अशा छोट्या छोट्या कामांचा आता मुलींनाच नाही तर मुलांनाही मोठं झाल्यावर खूप फायदा होतो. कसा? शिकायला होस्टेलवर किंवा परदेशात गेलं की सगळं आपलं आपलंच तर करावं लागतं ना! रद्दी आवरताना काहीतरी छान चित्र, गोष्टी सापडतात, ती कातरून ठेवा. रद्दीच्या कागदांच्या पिशव्या केल्यात तर घरात कितीतरी प्लास्टिक पिशव्या यायच्या कमी होतील.
अरे हो, विसरलेच एक गोष्ट... तुमच्या लांबच्या मावशी, काका, भावंडांना पत्र लिहा.. पत्र लिहिण्यात खरंच खूप मज्जा असते. त्यांचं उत्तर येईल तेव्हा तर अजूनच मजा वाटेल.
डान्स, स्विमिंग, स्केटिंग, झुम्बा, याचा क्लास एखादा तास, दोन-तीन दिवस कुठे नायचं उन्हाळी शिबिर याने तर इतक्या गोष्टी शिकतो आपण. आई-बाबांना सोडून राहायचं, आपलं आपलं सामान सांभाळायचं, कॅम्प फायर, खेळ आणि मुख्य म्हणजे नवीन लोकांशी ओळख कशी करून घ्यायची ते तर शिकतोच आपण !
अरे देवा... या सगळ्यात टीव्ही विसरलोच आपण !! खरंच, इतकं सगळं काय काय केलं, तर टीव्ही बघायला वेळच उरणार नाही.. हो ना? उरलाच, तर आवडते कार्टून, गाणी नक्की बघा.
सुट्टीत आईबाबांच्या बरोबर फिरायला गेलात तर तिथे काय काय पाहिलं, ते छोट्याशा डायरीत लिहून ठेवा.. नंतर ती चाळल्यावर आपल्यालाच मजा येते.
सुट्टी वेळ, तास, दिवस घालवण्यासाठी नसते... तर आठवणी निर्माण करण्यासाठी असते. याच आठवणींच्या जोरावर मोठेपणी आपण खूप छान जगतो. बघा करून... आठवणी अशाच तयार होत नाहीत, त्यासाठी आपणसुद्धा थोडा प्रयत्न करावा लागतो.
मीनल खेडकर