सुट्टीची मजा

शिक्षण विवेक    18-May-2025
Total Views |

सुट्टीची मजा


सुट्टी आली, मजा करा

इकडेतिकडे चला फिरा
 

गावी जाऊ मस्त प्रवास

आजोळाचा तो सहवास
 

रस आंब्याचा चाखा गोड

कलिंगडाची चविष्ट फोड
 

डोंगर, झाडे, पक्षी बघू

निसर्गासवे चला जगू
 

रोज लिहू या काही छान

पुस्तक वाचू पानोपान
 

संगणकाशी करू दोस्ती

मित्रांसंगे गुज गोष्टी
 

पत्ते, कॅरम, लगोरीचा

डावमांडू या खेळाचा
 

छंद करू या चला पुरे

कंटाळा हे नाव नुरे
 

कला शिकू या रोज नवी

म्हणून सुट्टी हवीहवी
 

।। चारुता प्रभुदेसाई ।।

मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे