|| प्रवेशोत्सव ||
ज्ञानमेव यज्ञ: ज्ञानयज्ञ:।
खोलेश्वर प्रगती वर्गातील विद्यार्थ्यांनी ज्ञानयज्ञाने केला विद्यारंभ!
-------------------------
अंबाजोगाई/ प्रतिनिधी:-
काल दि.१६ जून रोजी खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रवेशोत्सवाप्रसंगी ज्ञानयज्ञ (गणेशयाग) करून विद्यारंभ केला. बुद्धीदाता श्रीगणेश व विद्येची देवता सरस्वती यांचे पुजन प्राथमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष मा.श्री.उन्मेश दादा मातेकर यांनी सपत्नीक पूजन केले.
याप्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या मा.सौ.कल्पनाताई चौसाळकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह मा.श्री. किरण कोदरकर, मुख्याध्यापक मा.श्री. शिवाजी हेंडगे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या तथा विभाग प्रमुख मा.सौ.वर्षाताई मुंडे उपस्थित होते.
शाळेचे माजी विद्यार्थी असलेले श्री. किशोर जोशी, श्री. पुष्कर जहागिरदार, श्री. सुनील कुलकर्णी, श्री किरण जोशी या गुरुजींनी पूजनविधी पुर्ण केला.
मंत्रोच्चार, होमहवन, पूजनाने विद्यार्थ्यांवर संस्कार, मनाची एकाग्रता, गुरुकुल पद्धतीने केलेला विद्यारंभ असे संस्कार विद्यार्थ्यांवर केले गेले. विद्यार्थ्यांच्या समोर अग्नी मंथन व मंत्रांच्या साह्याने यज्ञ प्रज्वलित करण्यात आला. विद्याबंधनाचा धागा विद्यार्थ्यांना बांधण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.
वर्गावर्गात विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पानाफुलांचे तोरण वर्ग प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. शाळेतील सर्व फलकावर आकर्षक व प्रेरणादायी असे लेखन करण्यात आले.
अतिशय उत्साही व पवित्र अशा वातावरणामध्ये प्रवेशोत्सव व ज्ञानयज्ञ संपन्न झाला.