ढग

शिक्षण विवेक    02-Jun-2025
Total Views |


ढग

मोठमोठ्या नद्या आहेत पृथ्वीवरी

तयांचे पाणी जाते सागरी

अथांग पाणी अफाट सागरी

सागरच जास्त धरतीवरी

 

सूर्य करती नभी विहार

तयाचे ऊन पडे सागरावर

उन्हाळ्यात ऊन तापते खूप

उष्णतेने बनते पाण्याची वाफ

 

वाफेची प्रक्रिया आहे अति मंद

तयाने डोळ्यांना ती नाही दिसत

हळूहळू जाते वाफ वर वर

हवेसोबत खूप उंचावर

 

वाफेत धूर, धूळ वायूकण मिसळती

लहान मोठे ढग तयांचे बनती

वाऱ्यासोबत ढग है धावती

इकडून तिकडे आभाळावरती

 

ढगांच्या कणांत असते अंतर

हवेने बदलतो ढगांचा आकार

बघुनी ढगांना वनी नाचे मोर

गावातही आनंदती सारे पोरी पोरं

 

प्रा. देवबा शिवाजी पाटील खामगाव, जि. बुलडाणा