पुणे: ‘माझी शाळा ही सुंदर, आहे ज्ञानाचे मंदिर’ याची प्रचिती सर्वांनी हर्ष- उल्हासाच्या आनंदात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रायमरी व सेकंडरी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अनुभवली. शाळेच्या पहिल्या दिवशी टिळक रोड येथील प्रायमरी व डी.ई.एस.सेकंडरी सकाळ व दुपार विभाग शाळेत विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात औक्षण करून स्वागत करण्यात आले.
डी.ई.एस.सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, अर्चना धनावडे, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, ग्रेसी डिसोझा, सिमरन गुजर, शिक्षक, शिक्षिका, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी शाळेत इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचा गणवेशातील प्रवेश आनंददायी होता. विद्यार्थ्यांनी शाळेला, सरस्वती मातेला व गुरुजनांना वंदन केले. यानंतर शाळेची प्रार्थना घेण्यात आली. शाळेचे महत्त्व सांगणारे ‘स्कूल चले हम’ हे गीत ऐकविण्यात आले. प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे व सेकंडरी स्कूलच्या उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून २०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसत होता. वर्गात आनंद उत्साहाचे वातावरण चैतन्य निर्माण करणारे होते. सुट्टीनंतर विद्यार्थी मित्रांच्या वर्गातील भेटी आनंददायी होत्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर विजया जोशी,अर्चना धनावडे, शिक्षक, शिक्षिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वागत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक, डी. ई.एस. सेकंडरी शाळा, पुणे.