एन. ई.एम.एस शाळेत कालिदास दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

एन. ई.एम.एस शाळेत कालिदास दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    27-Jun-2025
Total Views |

एन. ई.एम.एस शाळेत कालिदास दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा 
एन. ई.एम.एस शाळेत कालिदास दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा
 
पुणे, गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी कालिदास दिनाचे औचित्य साधून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन. ई.एम.एस प्रशालेमध्ये कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक नागपूर विस्तार सेवा मंडळ रवी कीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली द्वारा आयोजित राज्यस्तरीय चित्रपदकोष स्पर्धा परीक्षेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
आजच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी संस्कृत विषय तज्ञ आणि संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्या अमिता जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्राथमिक विभागाच्या सकाळ आणि दुपार सत्रातील यशवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन करून यशापर्यंत पोहोचवले त्यासाठी संस्कृत विषयाच्या शिक्षिका अनघा पोळेकर यांचाही शाल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.अमिता जोशी यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि दरवर्षी अशा स्पर्धा परीक्षांना बसण्याचे प्रोत्साहन दिले.
प्रशालेतील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.हेमांगी देशमुख यांनी मुलांचे कौतुक करून
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच इयत्ता ६वी व ७ वी च्या दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर आधारीत कविता,माहिती सांगून त्यांचे स्मरण केले. काहींनी त्यांचे हुबेहूब छायाचित्र रेखाटले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थेत आपण शिकवत आहोत याचा अभिमान वाटतो असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनघा पोळेकर यांनी केले.