पाण्याचे असंगत आचरण

शिक्षण विवेक    03-Jun-2025
Total Views |


पाण्याचे असंगत आचरण

उन्हाळ्याचे दिवस होते. ओंकार मैदानावरून धापा टाकत घरात शिरला, संध्याकाळचे सात वाजले तरी उष्णता कमी झाली नव्हती. ओंकारने घरात आल्या आल्या फ्रीज उघडला आणि फ्रिजमधली बॉटल डायरेक्ट तोंडाला लावली. पण हे पाणी अजिबात बंड नव्हते तो चिडला. त्याने फ्रीजमधून बर्फाचा ट्रे काढला, पेल्यात पाणी घेऊन त्यात त्याने बफर्फाचे चार-पाच तुकडे टाकले आणि ते पाणी तो गटागटा प्यायला बंडगार पाण्याने त्याला तरतरी आली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अभ्यासाचे, शाळेचे टेन्शन नव्हते. आता हात-पाय धुऊन शुभकरोती म्हटले की तो त्याच्या फेवरेट पिक्चरची सातल्यांदा उजळणी करणार होता.

पण अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी चमकले. 'अरेच्या! आपल्या लक्षात कसे नाही आले आधी हे? कालच विज्ञानाच्या तासाला सरांनी घनता शिकवली होती. बायू अवस्थेत पदार्थाची घनता सगळ्यात कमी, द्रव अवस्थेत वायूपेक्षा जास्त घनता, तर स्थायू अवस्थेत सगळ्यात जास्त घनता. तसेच कमी घनता असणारा पदार्थ, जास्त घनता असलेल्या पदार्थाबर तरंगतो. जसे किल, लाकूड पाण्यावर तरंगतात. मग प्रश्न उरतो की बर्फ पाण्याचा बनला आहे. स्थायुरूप आहे. मग त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असायला हवी. तो पाण्यात टाकल्यावर बुडायला हवा. पण असे झाले नाही. आश्वर्य!

तो आपल्या शंकेचे निरसन करण्याकरता आपल्या ताईच्या खोलीकडे बळला. इंजिनियरिंगला असणारी त्याची ताई सायंटिस्ट म्हणून तिच्या मैत्रिणींमध्ये प्रसिद्ध होती. ओंकार तिच्या खोलीत गेल्याने तिच्या अभ्यासात खंड पडला खरा, पण तिलाही आपल्या लहान भावाचं कौतुक होतं. 'क्युकी पढ़ाई के मामले में ये भी कुछ कम नहीं था. काय खोटे उस्ताद! असा का चेहरा तुमचा 'चिता करतो विश्वाची मारखा? तिने विचारले. ओंकारने घडाघडा आपली शंका बोलून दाखवली. ताई त्याचा प्रत्र व निरीक्षण बघून खुश झाली व उत्साहाने त्याला समजावायला लागली. हे बघ पदार्थ जसा वायूतून द्रव आणि द्रवातून स्थायू अवस्थेत जातो तशी त्याची घनता बाढत जाते. पण पाणी मात्र याला अपवाद आहे. ४ डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सगळ्यात जास्त असते. त्यापेक्षा कमी तापमानाला पाण्याची घनता पुन्हा कमी होते. बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. समझे बच्चू? ताईने त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं, ओंकारचे समाधान झाले. त्याला आपली ताई एकदमच ग्रेट-बीट वाटायला लागली आणि तिच्याबद्दल आदरबिदरच बाटायला लागला, तेवढ्यात त्याला आपल्या खेळाची आठवण झाली आणि थैंक्य ताई। म्हणून तो तिथून पळाला,

शरयू श्रीगडीवार