निसर्ग आपला पिता,
तो सांगत होता त्याची कथा।
पृथ्वीवरती मानव आला
कळलच नाही तो कधी स्वार्थी झाला,
केमिकल मिसळलेले घटक ठेवले आणून
का? तर स्वतःचा व्यापार वाढावा म्हणून ।।
प्रदूषण करून ठेवलय जास्त
पण स्वतः मात्र राहतोय की मस्त,
गपणपती तर नाही ना म्हणत मानवा
की, माझ्यासाठी डि.जे.च लावा ।।
उभारले कारखाने, साधले स्वतःचे हित
विसरलात तुम्ही निसर्गाची रीत,
आणि झालीच की, हवा प्रदूषणाची जीत ।।
पाणी वाहता वाहता पाणी प्रदुषणही वाढले
आता प्लॅस्टिकचे प्रमाण वाढले खूप,
जलचर प्राण्यांचे त्याने बदलले रुप ।।
निसर्गाला द्या मान
निसर्गाचा करा सन्मान,
प्रदुषण करण्याऱ्यांचे पकडा कान
कमी करा निसर्गाचा ताण।।
अंकिता मोतिराम लकडे