डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये ‘वनराई इको क्लब’ची स्थापना.

शिक्षण विवेक    11-Jul-2025
Total Views |

डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये ‘वनराई इको क्लब’ची स्थापना.
 
पुणे : दिनांक ४ जुलै २०२५ रोजी टिळक मार्ग येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये वनराई इको क्लब ची स्थापना करण्यात आली.
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना वनराई व इको क्लब बद्दल शाळेतील वनराई प्रतिनिधी राघवेंद्र गणेशपुरे यांनी माहिती दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, शिक्षिका प्राची कुलकर्णी, किमया वरखेडकर, सुप्रिया शेट्टी आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, रक्षणासाठी,पर्यावरण पूरक उपक्रम,प्रकल्प,कार्यासाठी शाळेमध्ये ‘वनराई इको क्लब’ची स्थापना मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.