न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेतील दिनविशेष विभागाच्या वतीने 'जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन' साजरा.

शिक्षण विवेक    11-Jul-2025
Total Views |

जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन 
जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन ( विश्व लोकसंख्या दिन)
शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेतील दिनविशेष विभागाच्या वतीने 'जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन' साजरा करण्यात आला. भूगोल शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढीचे फायदे व तोटे या संबंधी आकर्षक मॉडेल,चार्ट,आलेख,आकृत्या,
घोषवाक्य तयार केले.या दिवसाचे औचित्य साधून प्रदर्शनही भरवण्यात आले.
शालाप्रमुख अनिता भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार हा उपक्रम घेण्यात आला.
इयत्ता नववी यलो या वर्गातील विद्यार्थी सोहम बागवे,अवनिश जवळेकर,पृथ्वीराज हत्ते या विद्यार्थ्यांनी राधिका देशपांडे व गीतांजली सरडे या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार लोकसंख्या वाढीच्या परिणामाविषयक जनजागृती करणारा स्वरचित संवाद सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कदम यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर आणि विद्यार्थी यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केले.