न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा.

शिक्षण विवेक    16-Jul-2025
Total Views |

कालिदास दिन 
कालिदास दिन
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये आषाढस्य प्रथम दिवस: म्हणजे कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी वर्गवाणीवरून कालिदासांच्या साहित्यकृतिंबद्दल व त्याचा भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीशी काय संबंध आहे याविषयी वर्षा गानू यांनी चिंतन प्रकट केले.
प्रशालेतील दहावीतील विद्यार्थ्यांनी कालिदास गीतगायन, कालिदासाच्या दंतकथा, त्यांच्या साहित्यकृती संस्कृत संवादातून नववीच्या विद्यार्थ्यांपुढे सादर केल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्कृत भाषेचे महत्व व संस्कृत शिकण्याच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रमुख पाहुण्या म्हणून संस्कृत अभ्यासक अमेरिका स्थित  नीरजा पाध्ये या उपस्थित होत्या. त्या स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असून संस्कृत व्याकरणात त्यांनी एम. ए. केलेले आहे व त्यांचा भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीचा अभ्यास आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना वराहमिहीर, भास्कराचार्य, आपली वेदपरंपरा, पाणिनीची शास्त्रशुद्ध व्याकरणशास्त्ररचना याचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर जर संस्कृत व्याकरण पक्के केले तर पुढे करिअरच्या काय संधी आहेत हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले.
प्रशालेत घेतल्या जाणाऱ्या कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ आयोजित संस्कृत प्रज्ञाशोध प्रतिभाशोध या परीक्षेमध्ये तसेच संस्कृतभारतीच्या सरला, सुगमा व सरसा या परीक्षांमध्ये विशेष योग्यता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजूषा शेलूकर या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षिका शितल चौधरी यांनी केले तर ऋणनिर्देश प्रज्ञा करडखेडकर यांनी व्यक्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे संयोजन संस्कृत विभागप्रमुख वर्षा गानू यांनी केले.