डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे
अहिल्यादेवी हायस्कूल, शनिवार पेठ पुणे
🔵आयोजित🔵
🟣कै. सौ. लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा २०२५-२०२६🟣
सप्रेम नमस्कार,
माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी कै. सौ. लक्ष्मीबाई रानडे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यावर्षी मुलींसाठी आयोजित केली आहे.
स्पर्धेचे स्वरूप: नियोजित व उत्स्फूर्त अशा दोन्ही स्पर्धा प्रकारांत प्रत्येक स्पर्धकाला भाग घ्यावा लागेल. नियोजित भाषणासाठी आयोजक कळवतील त्यापैकी कोणताही एक विषय निवडावा.
नियोजित विषयासाठी:
१) अभिजात भाषा माय मराठी- पुढे काय?
२) सोशल मीडिया- भस्मासुर की इष्टापत्ती
3) अवकाश खुणावते मानवाला
4) विद्या विनयेन शोभते
5) इतिहास हे सांगू पाहतोय.....
6) मैदानाशी जोडू नाते
7) सुंदराचा वेध लागो.... मानवाच्या जीवना
8) तुजसाठी मरण ते जनन
नियोजित भाषण:-
गुण: 40
भाषणाची वेळ: 8 मिनिटे
उत्स्फूर्त विषय:-
गुण: 60
भाषणाची वेळ: 5 मिनिटे
विचारार्थ वेळ: 10 मिनिटे
पारितोषिकाचे स्वरूप:
गुणानुक्रमे पहिले पाच क्रमांक अशी पारितोषिके देण्यात येतील. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ अहिल्यादेवी हायस्कूल फाॅर गर्ल्स पुणे येथे होणार आहे याची नोंद घ्यावी.