दिनांक 21 जून 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्रीडा शिक्षक सोनाली घोरपडे यांनी मुलांना योग दिनाची माहिती सांगितली. त्यानंतर इयत्ता दुसरी ,तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले त्यानंतर , विविध आसने केली .यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्येक आसनाचे नाव व त्याचे फायदे सांगण्यात आले. शाळेच्या मुख्या. सुरेखा जाधव यांनी मुलांना जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले.यावेळी शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री खेमराज रणपिसे उपस्थित होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व रोज सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन केले. व येणाऱ्या रथसप्तमीला सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास 125 सूर्यनमस्कार घालावेत असे सांगितले .सूर्यनमस्कार घातल्याने शरीर लवचिक होते ,मन शांत होते व अभ्यास परिपूर्ण होतो. आपला अन्नमयकोश व प्राणमैकोश तंदुरुस्त होतो.
ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , विठ्ठल मोरे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. आज पासून रोजच सूर्यनमस्कार , योगासने , प्राणायाम करणार अशी शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर