एच.ए. स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात रंगला नवागतांचा प्रवेशोत्सव!

19 Jul 2025 15:53:21

नवागतांचा प्रवेशोत्सव!
दिनांक 16 जून 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागात आज नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 चा नवागतांचा प्रवेशोत्सव दिमाखदार सोहळ्याने पार पडला. फुलांच्या वर्षावात , सनईच्या सप्तसुरात , ढोलच्या गजरात , पॉम पॉम च्या नृत्याने , रांगोळीच्या पायघड्यात , फुग्यांच्या कमानी मधून , औक्षण करून, सरस्वतीला वंदन करून , प्राणवायूचे स्त्रोत असणाऱ्या तुळशी चे वृक्षारोपण करून शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेत पदार्पण केले.
या कार्यक्रमासाठी डी इ एस संस्थेचे कौन्सिल मेंबर श्री मटकरी, शाला समितीचे अध्यक्ष श्री. खेमराज रणपिसे, शाला समिती सदस्य श्री कांबळे यांनी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके देण्यात आली , शालेय पोषण आहारांतर्गत खाऊ देण्यात आला .सौ. समिक्षा इसवे यांनी एक स्वरचित गाणे सादर केले त्यांना अनिता येनगुल व अनघा कडू यांनी साथ दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ शहनाझ हेब्बाळकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ अर्चना गोरे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. डॉ. श्री विठ्ठल मोरे यांनी आभार मानले.
अशाप्रमाणे अतिशय उत्साहवर्धक अशा वातावरणात एच.ए .स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या नवागतांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर
Powered By Sangraha 9.0