एच.ए. स्कूल प्राथमिक विभागामध्ये आज अवतरले विठ्ठल रखुमाई!

19 Jul 2025 16:03:29

vitthal rakhumai
दिनांक 23 जून 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेमध्ये आज पालखीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या , व संत तुकाराम ,संत नामदेव ,संत रामदास ,संत ज्ञानेश्वर ,संत मुक्ताबाई ,संत जनाबाई अशा विविध संतांच्या पोशाखात आले होते. मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.... तर मुलांनी टाळ , मृदंग , भगवी पताका हातात घेतली होती. त्रिशा मुंगेकर रुक्मिणी तर यश पवार विठ्ठलाच्या वेशभूषेत आले होते.
सर्वप्रथम मा. मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन व विठ्ठलाची आरती करण्यात आली . राजश्री भालेराव यांनी सूत्रसंचालन केले , नंदिनी मोळे यांनी मुलांना गोष्टी रूपात पालखीची माहिती सांगितली. यानंतर शाळेचे बाल वारकरी विठू नामाचा गजर करत , अभंग म्हणत एच. ए. कॉलनी मधील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांच्यासोबत आमच्या बाल विठ्ठल रखुमाई ने सुद्धा मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतले जगातील सर्वांना सुखी व आनंदी ठेव अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. रक्षा अंबाडे या विद्यार्थिनीने अभंग गायला.
यावेळी समीक्षा इसवे , अनिता येनगुल ,अनघा कडू , सीमा हांगे , शहनाझ हेब्बाळकर , डॉ.विठ्ठल मोरे , धनश्री पाटील , मनीषा भिसे यांनी भजन, अभंग गाऊन वारकऱ्यांना साथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांना साखर फुटाणे यांचा प्रसाद देण्यात आला.
शब्दांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर
Powered By Sangraha 9.0