पुणे :येथील डी.एस.सेकंडरी शाळेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डी.ई.एस.सेकंडरी शाळेचा ४१वा संस्थापना दिन (फाउंडेशन डे) आज दिनांक १० जून २०२५ रोजी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर,शिक्षक,
शिक्षिका आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी धनंजय कुलकर्णी यांनी शिक्षक शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षक शिक्षिकांशी संवाद साधला. प्रस्तावना विजया जोशी यांनी केली. त्यांनी शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देऊन आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन केले. संगीत शिक्षिका भक्ती पटवर्धन यांनी सरस्वती वंदनाचे गायन केले.शिक्षिका किमया वरखेडकर यांनी शाळा व संस्थेच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यानंतर पूर्व प्राथमिक शाळेच्या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. मराठी विषय शिक्षक राघवेंद्र गणेशपुरे यांनी स्वरचित‘भारत मां को कर प्रणाम’ ही हिंदी कविता सादर केली. संगीत शिक्षिका हर्षदा कारेकर यांनी ‘संस्थापना दिन’ गीताचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन किमया वरखेडकर यांनी केले. नैनसी गवारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पूर्व, प्राथमिक, सेकंडरी विभागातील, सकाळ व दुपार विभागातील, शिक्षक, शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात सर्वांनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक, डी.ई.एस. सेकंडरी स्कूल, टिळक रोड, पुणे