पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक एकत्र येणार आहेत, या भाविकांना प्रसाद म्हणून श्री विठ्ठल देशी वृक्षबीज पाकीट देण्यात येणार आहे. ही बीजरुपी प्रसादाची सहा हजार पाकीटे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आणि चार जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी रमणबाग प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजूषा शेलूकर यांच्या मार्गदर्शनाने हेमंत पाठक व पर्यावरण विभाग प्रमुख सविता कदम यांनी केले. या उपक्रमात पाचशे विद्यार्थी सहभागी झाले.