रमणबाग प्रशालेत अण्णाभाऊ साठे यांना कथा अभिवाचनाद्वारे आदरांजली!

शिक्षण विवेक    19-Jul-2025
Total Views |

अण्णाभाऊ साठे यांना कथा अभिवाचनाद्वारे आदरांजली!
शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अण्णाभाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. कार्यक्रमास पुणे विद्यापीठातील व्यवस्थापक परिषद सदस्य श्रीम. बागेश्री मंठाळकर आणि अण्णाभाऊ साठे अध्यासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.सुनील भंडगे उपस्थित होते.प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊंची 'माझी मैना गावाकडे राहिली 'ही प्रसिद्ध छक्कड विद्यार्थ्यांनी सादर केली. अण्णाभाऊंच्या अमृत,चोरांची संगत, रेडं झुंज,स्मशानातील सोनं आणि फकीरा या कादंबरीतील निवडक भागाचे प्रभावी अभिवाचन नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नाट्यकर्मी शिक्षक रवींद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सुहास देशपांडे यांनी करुन दिला. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक जयंत टोले व पर्यवेक्षक मंजूषा शेलूकर तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.