
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शनिवार दि.२१जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.योग साधनेच्या माध्यमातून स्वतःचे स्वास्थ्य उत्तम राखले तर सामाजिक स्वास्थ्यही आपोआपच जपले जाते म्हणूनच शाळेत विद्यार्थ्यांना योगासने शिकवण्यात येतात असे शालाप्रमुख मा.चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून सांगितले. क्रीडा भारती महाराष्ट्र प्रांत संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असलेले श्री.दीपक मेहंदळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मनाची एकाग्रता योगसाधनेनेच साध्य होते.प्रकृती निरोगी व निकोप राहण्यासाठी योगासने करण्याची योग्य पद्धती व फायदे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. याप्रसंगी ताडासन,त्रिकोणासन,वृक्षासन खलासन,पवनमुक्तासन बालासन ,पद्मासन, इत्यादी योगासनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी कुशलतेने सादर केली.मनीष चलवादी या विद्यार्थ्याने तर अवघड असे द्विपादग्रीवासन लिलया केले. पुस्तक देऊन मुख्याध्यापकांनी त्याचे विशेष कौतुक केले.पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी अतिथींचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक रमेश शेलार यांनी केले तर महेश जोशी यांनी आभार मानले.कार्यक्रमास उपप्रमुख जयंत टोले व पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.