शनिवार दिनांक 19 जुलै रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमणबाग प्रशालेत स्वरझंकार संस्थेतर्फे सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अजय पराड व त्यांचे सहकारी यांनी व्हायोलिन,तबला व हार्मोनियम या वाद्यांच्या सहाय्याने शास्त्रीय संगीताचे सादरीकरण केले.श्री.अजय पराड यांनी आपल्या मनोगतातून शास्त्रीय संगीताचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
स्वरझंकार संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या संगीत वर्गामध्ये संगीत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी त्यांच्या यशाबद्दल प्रशस्तिपत्रके देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल चौधरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हर्षद गाडगीळ यांनी करून दिला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजूषा शेलूकर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.