नूतन ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयत गुणगौरव समारंभ व शालेय साहित्याचे वाटप.

02 Jul 2025 11:55:50


नूतन ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय 

नूतन ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयत गुणगौरव समारंभ व शालेय साहित्याचे वाटप.

नूतन ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कल्याण पूर्व, तसेच "सेवा सहयोग फाउंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत शैक्षणिक वर्ष 2024 25 च्या शालांत परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला 90% टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी माळी यशश्री 95.80 % जाधव आस्था 94.40% पाटील मयुरी 93.20% माने सान्वी 90.60 % तर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्य शाखेचे गोंदके हर्षदा, भोळे दर्शना, पाटील प्रिया, वाघमारे सोहम यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेवा सहयोग फाउंडेशन चे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विनय बर्वे यांनी "उत्कर्ष हवा असल्यास संघर्ष करावा लागतो" या संदेशासहित विद्यार्थ्यांना अभ्यास मेहनत व सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांतजी तरटे सर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या "उज्वल भविष्यासाठी" शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना यावेळी "सेवा सहयोग फाउंडेशन" च्या वतीने गरजू व इकॉनोमिकली दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप विनय बर्वे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे, तसेच प्राथमिक विभागाच्या ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी ,दप्तर यासारखे शालेय साहित्य विनामूल्य वितरित करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात आवश्यक त्या साधनांची मदत मिळावी आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला .प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या 200 विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून सेवा सहयोग फाउंडेशनचे सामाजिक भान आणि बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी प्रभावीपणे पार पाडले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील, सांस्कृतिक प्रमुख ज्योती चौधरी आणि रेणुका जोईल यांच्या समन्वयातून संपूर्ण कार्यक्रम अतिशय यशस्वी व प्रेरणादायी ठरला .हा समारंभ विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा व सकारात्मकता निर्माण करणारा ठरला असून सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Powered By Sangraha 9.0