मलेशिया देशामध्ये ‘आयमा जागतिक चॅम्पियनशिप’ या जगप्रसिद्ध अबॅकस आणि मेंटल अरथमॅटिक अलाईन्सद्वारे जगातील १४ देशांच्या ६ ते १४ वयोगटातील स्पर्धकांची जागतिक स्पर्धापरीक्षा आयसिटी सेलेंगोर मलेशिया या ठिकाणी संपन्न झाली.
या जागतिक स्पर्धेत भारतातील एकूण ८७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. हे सर्व स्पर्धक भारतातील नामांकित अशा अॅकॅडमी केंद्रातून सहभागी झाले होते. त्यात वंडर किड्स लर्निंग अकॅडमी मुंबई, पुणे, दिल्ली, मध्य प्रदेश यांच्या अॅकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलेल्या स्पर्धकांचा सहभाग होता.
हे सर्व स्पर्धक भारतीय स्तरावर अव्वल स्थान पटकावलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च अशी कामगिरी बजावणारे ‘सर्वोच्च’ असे निवडलेले स्पर्धक होते.
भारत, तैवान, मलेशिया, इंडोनेशिया, जपान, साऊथ कोरिया, श्रीलंका, चीन, साऊथ आफ्रिका, पनामा, लेबनॉन, कंबोडिया, इराक, रशिया अशा संपूर्ण जागतिक १४ देशातील ६ ते १४ वयोगटातील एकूण ४८८ स्पर्धकांनी या जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेत अबॅकस स्पर्धेच्या ७ वेगवेगळ्या श्रेणी निर्धारित केलेल्या होत्या व त्या सर्वांतून या ४८८ स्पर्धकांनी आपले ध्येय पार पाडायाचे होते. या ७ निवडश्रेणीतून मुंबई प्रांतातील उत्कृष्ट उज्ज्वल यश संपादित करणारे स्पर्धक आदिराज दिग्विजय मेस्त्री, जय माधव भांगरे, रियान चंद्राना आणि ईशान देसाई या चार स्पर्धकांनी स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त करून मुंबई सहित महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर दुमदुमवले आहे.
त्याच प्रमाणे ११ किशोर स्पर्धक स्पृहा शार्दुल आपटे, पूर्वा मच्छिंद्र मुरुडकर, अस्मी महेंद्र सावंत, प्रिशा अभिजीत साटम, श्रीहान अनिश देशपांडे, प्रिशा विजय शिवदास, तक्ष श्रवण काऊंडर, विहान महेश साखरकर, देवांश संदेश लाड, ओमकार अमोल पवार, श्राव्या प्रमोद शिर्के यांनी मेंटल पॉवर्स बुद्धिमत्तेच्या अजोड प्रतिभेचे चमकदार प्रदर्शन करीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
उर्वरित १८ किशोर स्पर्धक आराध्या आशुतोष पाटील, जय केशव बोऱ्हाडे, अवनि केशव बोऱ्हाडे, श्रावणी सुनीलदत्त गुरव, आद्या रुपेश भाटकर, कैवल्य प्रशांत नारकर, यश संदिप परब, तीर्थ विवेक हरखानी, कलश कृष्णराव काटुलु, समन्यु समर्थ महाडिक, अद्वय दीगंबर पाटकर, निषाद निलेश साळुंके, शाश्वत दासरि, सुप्रभा आर सिंधू, शाहिद घावटे, हितांशी कमलेश पाटील, अह्यान सय्यद, अमान सय्यद यांनी अत्यंत चुरशीने तिसरे स्थान बळकाविण्यात अमोघ असे यश संपादित केले.
वंडर किड्स लर्निंग अॅकॅडमी मुंबई यांना समृद्ध मार्गदर्शन आणि भक्कम प्रोत्साहन पाठींबा यासाठी गौरविण्यात आले. लिना पाटील आणि श्रुती पाटील यांना निष्ठापूर्वक आणि बांधिलकीपूर्वक किशोर स्पर्धकांमधील प्रतिभेला खतपाणी घालून जोपासना करून घवघवीत यश संपादित करून दिल्याबद्दल ‘उत्कृष्ट प्रशिक्षक’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
अत्यंत चुरशीच्या या जागतिक स्पर्धेतील अबॅकस आणि मनोगणित, ७ निवड श्रेणीतून १४ देशातील स्पर्धकांचा अतुलनीय असा सामना करीत भारत देशातील स्पर्धकांनी जागतिक स्तरावर दुसरे स्थान पटकविण्याची शानदार कामगिरी केली आणि भारताचा तिरंगा या जागतिक स्पर्धेत झळकावला.
भारताला या स्पर्धेत उत्कृष्ट देश अशी २ पारितोषिके आणि ८७ स्पर्धकांना पारितोषिके बहाल झाली. या सर्वांचे महान फळ म्हणून भारत हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला. हा बहुमान भारताने १४ देशातील स्पर्धकांशी लढून जिंकला होता. एक अजिंक्य देश म्हणून... अजिंक्य कामगिरी म्हणून...
इंडोनेशिया या देशाला अव्वल स्थान प्राप्त झाले. आशुतोष पाटील, भारताचे राजदूत आणि कॉउंसिल मेंबर ऑफ अबॅकस किंग तथा संस्थापक आणि संचालक, वंडर किड्स लर्निंग अकॅडमी मुंबई यांना भारताच्या तरुण स्पर्धकांच्या उत्तुंग यशाच्या कामगिरीचा गौरव म्हणून २ विजयचिन्ह (पारितोषिक) बहाल करण्यात आली.
‘आयमा जागतिक चॅम्पिअनशिप’ स्पर्धेतील भारताचे घवघवीत यश हे भारताची शान संपूर्ण जगात उंचावणारी असून भारत हा अबॅकस आणि मनोगणित क्षेत्रात ‘उत्तुंग ऊर्जा मनोरा’ म्हणून जगात मिरवणार आहे याबद्दल शंका नाही. पुढील जागतिक अबॅकस ऑलंम्पियाड स्पर्धा तैवान देशात सन २०२६ मध्ये संपन्न होणार आहे.