शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी वार्षिक बैठक २०२५-२६

शिक्षण विवेक    05-Jul-2025
Total Views |

 
shikshanvivek shikshak pratinidhi varshik baithak

शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी २०२५ -२६ वार्षिक बैठक शनिवार, दि. ०५ जुलै २०२५ रोजी स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे संपन्न झाली. बैठकीच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सचिव मा. अतुल कुलकर्णी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळ आजीव सदस्य मा. वैशाली पोतदार उपस्थित होते. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षणविवेकचा अंक, स्पर्धा आणि उपक्रम याविषयी माहिती दिली. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणातील संकल्पना आपण शिक्षणविवेक अंकासाठी कशा पद्धतीने वापरू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच वैशाली पोतदार यांनी शिक्षणविवेक अंक आणि स्पर्धा-उपक्रमांचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होतो, हे सांगितले. शिक्षणविवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांनी उपस्थित सर्व शिक्षक प्रतिनिधींशी शिक्षणविवेक अंक-स्पर्धा-उपक्रमांसंदर्भात संवाद साधला.

यावेळी ‘चळवळ : शैक्षणिक गुणवत्तेसाठी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी ‘चळवळीसंदर्भात’ मार्गदर्शनपर सत्र घेत. चळवळी कशा उभ्या राहतात आणि लोकसहभागातून त्याला विधायक दिशा मिळते यावर भाष्य केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. भूषण पटवर्धन यांनी ‘भारतीय ज्ञान परंपरेची गरज’ याविषयी मार्गदर्शन केले. या सत्रातून शिक्षकांना अभ्यास कसा करावा याचं प्रात्यक्षिक मिळालं. त्यांचं अनेक वर्षांचं ज्ञान, यू.जी.सी.चे माजी उपाध्यक्ष म्हणून काम करतानाची त्यांची निरीक्षणं आणि अभ्यास त्यांनी मांडला. भारतीय ज्ञान परांपरेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला गती आणण्यासाठी शिक्षकांचा वाटा गरजेचा आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. अ.ल. देशमुख यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक म्हणून माझी भूमिका’ याविषयावर मांडणी केली. शिक्षकांना लगेचच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजावणी वैयक्तिक पातळीवर अनेक मार्गांनी कशी सुरू करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केलं. ‘शाळा ही प्रयोगशाळा आहे आणि शिक्षक हे संशोधक आहेत’, असे वक्तव्यही त्यांनी केले. विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी कार्यशाळेचा समारोप केला.