रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

05 Jul 2025 17:53:18

 
रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

शनिवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत पंढरीच्या वारीचा अनुभव विद्यार्थ्यांनी दिंडी काढून घेतला. विठ्ठल,रुक्मिणी सह ज्ञानदेव,तुकाराम नामदेव,मुक्ताई अशा विविध संतांच्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वारीत सहभागी झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माजी प्रबंधक डॉ.सविता केळकर यांच्या स्वरचित 'पंढरीची वाट पाऊले चालती' या अभंगाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. शाला समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे सन्माननीय माजी विद्यार्थी डॉ.शरद अगरखेडकर, शालाप्रमुख अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर व अंजली गोरे यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले व पालखी सोहळ्याला आरंभ झाला. प्रशालेच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांनी पालखी सोहळ्याचे दिग्दर्शन केले.आशा गुरसाळे व मल्हारी रोकडे या शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. गणेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षक ,शिक्षकेतर, विद्यार्थी व पालकांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.तसेच चित्रकला विभागातर्फे आषाढी वारीनिमित्त 'अक्षरवारी' या सुलेखनाच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.या प्रदर्शनात महाराष्ट्रातील २० सुलेखनकारांच्या ७०अक्षर कलाकृती सादर केल्या आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन आदित्य देशपांडे व शाला समितीचे अध्यक्ष डॉ.शरदअगरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन दाखविण्यात येणार असून यातून सुलेखन करण्याच्या विविध पद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुलेखनाची गोडी निर्माण होणे हा या मागचा हेतू आहे.इयत्ता पाचवी ऑरेंजच्या विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवारच्या अंतर्गत क्राफ्टच्या शिक्षिका दिपाली चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या विविध पालख्यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले.

Powered By Sangraha 9.0