मनुष्य सत्कारानी पड़ती, संस्कारहीन मनुष्य म्हणजे पशूच होय असे म्हटले जाते. मनुष्यमात्रातील सहजप्रवृत्तीचे उदात्तीकरण शिक्षणाने होते. उदात्तीकरण करण्याचे संस्कार गुरुजन करत असतात. शिक्षण म्हणजे संस्कारच व्यक्तिगत भांडणात रमलेल्या विद्यार्थ्याला 'राष्ट्रासाठी लढणारा हो', ही प्रेरणा गुरुजीच देत असतात.
सुप्रसिद्ध लेखक काइित म्हणतात, 'योर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास,' राष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देण्याचे कार्य त्या त्या राष्ट्रातील थोर पुरुषच करत असतात, असे थोर पुरुष ज्या गुरुजनांनी घडवले, ते शिल्पकार नव्हेत काय?
छत्रपती शिवरायांनी उभा महाराष्ट्र जागृत करून 'बाची देही याची डोळा' स्वराज्य स्थापना केली. देव, देश, धर्म यांना संकटमुक्त केले. त्या शिवरायांना घडवणारे दादोजी कोंडदेव शिल्पकार नव्हेत काय ?
'केल्याने होत आहे रे', परंतु 'आधी केलेचि पाहिजे असे म्हणणारे समर्थ रामदास, 'असाध्य ते साध्य करिता सायास' म्हणणारे तुकाराम आदी संत राष्ट्रजीवनाचे शिल्पकार नाहीत असे कोण म्हणेल?
काही काळ प्राध्यापक म्हणून काम करणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी 'सब्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटी'ची स्थापना करून राष्ट्रासाठी जीवनसमर्पण करणारे कार्यकर्ते घडवले. त्यांना आपण काय म्हणू शकतो? महात्मा गांधीजींनी ज्यांना आपले गुरुपद दिले ते गोखले, त्यांची थोरवी आपण कशी आणि किती वर्णावी।
मरगळलेल्या, निस्तेज बनलेल्या भारतीय समाजाला ताठ मानेने उमे करावयाचे असेल, तर त्याला राष्ट्रीय शिक्षणाची संजीवनी दिली पाहिजे. त्यासाठी स्वार्थ जाळून, सरकारी नोकऱ्यांचे मोह टाळून, विष्णूशाखी चिपळूणकरांना 'न्यू इंग्लिश स्कूल' काढण्यास धावून गेले पाहिजे, असे सांगणारे लोकमान्य टिळक, आगरकर कोण होते? सर्व जगामध्ये हिंदू तत्त्वज्ञानाचा डंका घुमवणाऱ्या नरेंद्र दत्त यांचा 'विवेकानंद' कोणी बनवता ? दरिद्री नारायणाची सेवा हीच ईश्वरसेवा, है नवे विचार विवेकानंदांच्या ठायी कोणी रुजवले, रामकृष्ण परमहंस्मानीथ ना।
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रानडे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, आचार्य नरेंद्र देव, महर्षी कर्वे, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सारे प्रथम शिक्षकच होते. राष्ट्रजीयन घडवण्यातील त्यांचा बाटा कोण नाकारू शकेल काय?
आपणही दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्याच्यांचे जीवन घडवण्याचे महान कार्य करावयास पाहिजे. सध्या सर्वत्र आढळणारी बेशिस्त बेपर्वाईची माधना, भ्रष्टाचार, अनाचार नष्ट करून, राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती करणे आपणा सर्व शिक्षका अत्यंत महत्त्वाचे दायित्व आहे. या दायित्वाचे मान ठेवून आपन शिक्षकीपेशात कार्य केल्यास स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होईल. त्यासाठी मात्र शिक्षकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण मास्तर, गुरुजी, अध्यापक, आचार्य, गुरुदेव या क्रमाने वरवर जातो आहोत की नाही, याचे चिंतन करावे लागेल, शिक्षक धर्माचे आचरण आणि पालन आपल्या हातून नित्य होईल, तर नक्कीच २०२० साली भारत जगातील सर्वश्रेष्ठ देश होईल, तसेच आपल्या पूर्वसुरींप्रमाणे राष्ट्रजीवनाचे शिल्पकार होण्याचे कार्य आपल्या हातून होईल.
उमा जोशी
एरंडवणा माध्यमिक विद्यालय