शिक्षक-विद्यार्थी नाते

06 Jul 2025 19:00:00


शिक्षक-विद्यार्थी नाते

शाळेच्या वर्गामध्ये प्रमाणापेक्षा अधिक मुले कॉबली जातात, त्यांच्याकडून विविध विषय घोकंपट्टी करून घेतले जात आहेत. छोट्या-छोट्या खांद्यावर मणा-मणाच्या दारांचे ओझे घेऊन गणित, विज्ञान, भाषा, कार्यानुभव, परिसर अभ्यास अशा विषयांतून वाट काढत काढत बकलेले मूल घरी जाते. थोडे खेळू म्हणते, हुंदडू म्हणते; तोच माँसाहेब त्यांच्या पोटाची काळजी करत काही पदार्थ त्याच्यापुढे ठेवतात. कपडे बदलून त्याला कुठल्यातरी एक्स्ट्रा क्लासला जायचे असते. त्याच्यापुढे पर्याय नसतो. कारण एकतर माराचा धाक, नापास होण्याची भौती किंवा देण्यात येणाऱ्या नवनव्या वस्तूंचे आमिष, यापुढे मान तुकवून ते मूल जाते. आल्यावर थोडा टी. व्ही. मग जेवण, घरचा अभ्यास हे अखंड त्याच्या मानगुटीवर बसते. ते सारे पूर्ण करता-करता डोळ्यांवर आपड येऊ लागते आणि स्वप्न पडू लागतात ती पन्ऱ्यांची नव्हे तर उद्या शाळेत काय शिकवणार आहेत? कोणती टेस्ट आहे? किती मार्क पडतील याची. हा झाला विद्यार्थ्यांचा आलेख. आता शिक्षक.

वैयक्तिक आयुष्यातील असंख्य तणाव आणि कामाच्या ठिकाणी येणारे ताण सोसत शिक्षक वर्गात पोहोचतात. वर्गातील मुलांची संख्या त्यांच्या आवाक्याबाहेरची असते. कधी हसत, कधी ओरडत, साधारण हुशार, चलाख मुले कोणती हे त्यांना शोधता आले की त्यांचे अर्थ काम होते. असंख्य स्पर्धांची त्या मुलांना व पालकांना फक्त माहिती द्यायची, पालक स्पर्धेला तयारच असतात. आपोआप वर्गाच्या प्रगतीचा आलेख कायम राखला जातो. उरलेल्या दिवसात एक्स्ट्रा क्लास घेता येतो पुन्हा वर्गातल्या मुलांना पुढे आणण्याचा पालकांचा धाक त्यांना असतोच. रोज अभ्यास तपासणे शक्य नसले तरी वेळ मिळेल तेव्हा वह्या तपासणे, ओरडणे, मारणे, छोट्या-मोठ्या शिक्षा करणे हा त्यांच्या शालेय दिनक्रमाचा भाग असतो. शिवाय सर्व शिक्षा अभियान म्हणजे सर्व मुलांनी शाळेत जाणे. त्या प्रत्येकाची जबाबदारी घेणे नव्हे,

याबर कड़ी म्हणजे, शाळा सुटण्यापूर्वी जरा पालकांच्या घोळक्यात उभे राहिले की, मजेशीर संवाद कानावर पडतात. अमुक शिक्षक वर्गात अभ्यसाच देत नाहीत. मी तर अभ्यास केला नाही, तर मारा असेच सांगितले. नुसता अभ्यास करून आजच्या काळात भागत नाही तर खेळ, नाटक, गाण; झालेच तर स्पर्धापरीक्षासुद्धा हव्यात.

तुम्ही म्हणाल शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते सांगण्यासाठी इतके विषयांतर कशाला? थोडा विचार केलात ना तर जाणवेल विद्यार्थी-शिक्षक आणि पर्यायाने ही शिक्षणाची सद्यस्थिती आहे. जी आपण सर्वचजण अनुभवतो आहोत. समाजात आजही उत्तमरीतीने चालवल्या जाणाऱ्या शाळा आहेत. खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत बऱ्याचशा शाळा या एका पठडीतून चालवल्या जातात. काही शाळा उद्याची आशा असल्या तरी जे चित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. तेच विचारात घ्यावे लागते. त्याशिवाय विषयाचे गांभीर्यही कळणार नाही. झाले शालेय शिक्षणाचे. महाविद्यालयांकडे बघितले तर काय दिसते. मुले वर्गात बसत नाहीत म्हणून तास होत नाहीत आणि तास होत नाहीत म्हणून मुले वर्गात बसत नाहीत. यशाची शिखरे पादाक्रांत करणारे अनेक तरुण देशात आहेत, पण ते प्रातिनिधिक नाहीत. बऱ्याच महाविद्यालयात शैक्षणिक दुरवस्था निर्माण झालेली दिसते.

पूर्वी गुरुगृही राहून विद्यार्थी शिकत. अगदी शाळेमधील शिक्षण सुरू झाल्यानंतरही गुरूच्या वर्तनाकडे पाहन त्यांच्या सहवासात राहून अनेक गोष्टी शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असे. परंतु आज अभ्यास या प्रंचड ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकांचे अवलोकन करायला वेळच नाही आणि शिक्षकही आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मग्न असल्यामुळे विद्यार्थ्याला जागृत करायला त्याच्याकडे वेळ ही. असलाच तर शिकवणे एवढेच माझे काम आहे. विद्यार्थ्याला जागृत करणे माझे काम नाही. त्याचे त्याला कळत नाही का? असे त्यांचे मत असणार त्यामुळे समाजामध्ये सर्वच नात्यांतील संवादाला अडगळ निर्माण झाले असताना शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे नाते त्याला कसे अपवाद ठरेल?

खरे तर, शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते इतके रम्य आहे. एक ज्ञानाच्या पलीकडे पोहोचूनही ज्ञानमार्गावर अव्याहत चालणारा आणि दुसरा ज्ञानाच्या अलीकडे. दोघेही ज्ञानमार्गीच पण एक थोडा पुढे गेलेला. वाटेवरून चालता चालता, या वाटेवर चालण्यास उत्सुक असणाऱ्या अनेकांना वाट दाखवणारा, थकलेल्यांच्या पाठीवर हात फिरवणारा, जिंकणाऱ्यांच्या पाठीवर थाप मारणारा, गोंधळलेल्यांना सावरणारा, ज्यांना सावरायचे त्यांच्याकडूनही खूप काही शिकणारा असा शिक्षक आणि सदैव ज्ञानपिपासु, शिकण्यासठी सदैव उत्सुक असलेला, प्रत्येक अनुभवातून काही शिकणारा स्वतःवरचा विश्वास सिद्ध करणारा आणि विश्वास ठेवणारा विद्यार्थी. दोघेही एकमेकांच्या सान्निध्यात समृद्ध होत जाणारे. पण आज हे स्वप्नवत वाटते. गुरूवरील निष्ठेपायी अंगठा देणारा एकलव्य किंवा शिष्याला ज्ञानाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून उतरवणारे विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस या गोष्टी इतिहासात जमा झाल्या. आज हे औषधालाही सापडत नाही.

शिक्षक-विद्यार्थी हे नाते मैत्र जपणारे असले तरी आदराची एक पायरी या दोघांमधले अंतर ठळक करते. आपला विद्यार्थी स्वबळावर यशस्वी व्हावा असे खऱ्या शिक्षकाला वाटते. पण आज आपल्या विद्यार्थ्याला कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकाला शिक्षक तरी कसे म्हणावे? आणि आपल्या शिक्षकाने पेपर सोडवताना आपली मदत करावी अशी अपेक्षा बाळगणाऱ्याला विद्यार्थी तरी कसे म्हणावे? याचे कारण अलीकडे परीक्षार्थीचे वाढते प्रमाण! त्यातून दुर्बीण लावून विद्यार्थी शोधावा लागतो. यालाही अपवाद आहेत. देशाच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात अतिशय वेगळे आणि महत्त्वाचे काम करणारे तरुण आहेतच; तेही विद्यार्थीच. परंतु सर्वसाधारण पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याने ते विचारात घ्यावे लागते आणि अधिक प्रमाणातील विद्यार्थीच परीक्षार्थी असल्याने त्याच्या प्रगतीचा परिणाम एकंदर देशाच्या प्रगतीवर होतोच. विकास झाला असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा शहरातील गगनचुंबी इमारतीत राहाणाऱ्या एखाद्या मुलांमधला विद्यार्थी जेवढा जागा असेल तेवढाच खेड्यातला एखाद्या झोपडीत राहणाऱ्या मुलामधला विद्यार्थी जागा होईल. शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आपल्याला रोल नं. मिळाला म्हणजे आपण विद्यार्थी होत नाही. तसेच शिक्षकाची पदवी मिळवून, वर्गात जाऊन तास घेतला म्हणजे आपण शिक्षक होत नाही. विद्यार्थीपण किंवा शिक्षकपण सिद्ध करावे लागते. सर्व कसोट्यांवर उतरून सिद्ध झालेले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात जे नाते तयार होते, ते समाजात अमूलाग्र बदल घडवत विकास आणते. पर्यायाने समृद्धीच्या रूपाने शेवटी आनंदच आणते.

- डॉ. मानसी गानू

९८६०२७२५०६

Powered By Sangraha 9.0