आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडवणाऱ्यांचे पूजन होते. संस्कृती घडवण्याचे काम अनेक ऋषींनी केले आहे. पण बेदव्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष म्हणजेच महाभारतासारखा महान ग्रंथ आपल्याला दिला.
व्यास हे समाजाचे खरे गुरू होते. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली जाते.
व्यासऋषी हे जसे आपले गुरू आहेत, तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक महर्षी अण्णा कवें हेदेखील आपलेच गुरू आहेत. जी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असते. सत्याच्या मागनि चालायला शिकवते आणि ज्या-ज्या ठिकाणी आपण चुकतो, त्या-त्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते. ती व्यक्ती म्हणजे आपला गुरू होय. ज्या व्यक्तीकडून आपल्याला चांगले शिकायला मिळते. ती ती व्यक्ती आपला गुरूच असते, निसर्ग हा आपला गुरूच आहे. त्याच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. मुंगी हा एक छोटासा प्राणी आहे. परंतु तो आपला गुरू आहे. तिच्याकडून आपल्याला सतत प्रयत्न करत राहणे आणि मेहनत करणे इ. गोष्टी शिकायला मिळतात. अशा अनेक प्राणी पक्षांकडून आपल्याला काही ना काही शिकावयास मिळते.
गुरुपूजन म्हणजेच ध्येयपूजन, गुरूचे जीवन जसे ध्येयमूर्तीसारखे असते. तसेच गुरू आपल्या शिष्याचे जीवन घडविण्याचा प्रयत्न करत असतो. शिष्याच्या अंधारमय जीवनात गुरू प्रकाश प्रदीप पेटवत असतो. शिष्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे बळवतो आणि शिष्य गुरूजवळ बसून नम्रता, जिज्ञास आणि सेवा हह्यांच्याद्वारे गुरूजवळ असलेले ज्ञानामृत पित असतो आणि आपलं जीवन सुखकर करीत असतो.
परिस हा लोखंडाचे सोनें घडवतो, पण स्वतःसारखा परिस करत नाही. परंतु गुरू हा शिष्याला स्वतःचे गुरुत्व देत असतो. स्वतःसारखा करण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणूनच ज्ञानाचा सूर्य प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल असलेला या गुरूला भारतीय संस्कृतीने कळसरूप देऊन नेहमीच पूजिले आहे.
अशा या कळसरूप असलेल्या गुरूचे आपल्यावर अनंत उपकार असतात. म्हणूनच या सद्रूविषयी कृतज्ञतेने म्हणावेसे वाटते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्य तसमै श्री गुरवे नमः ।।
संगीता साळुंके, उपशिक्षिका