गुणगौरव सोहळा: दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे ( २८ जून, शनिवार): म.ए.सो.च्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या सभागृहात इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव समारंभ' अत्यंत प्रेरणादायी व उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका ज्योती खिरीड मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व स्वागत केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
दहावी - जिज्ञासा जनार्दन झोरे — ५०० पैकी ४५७ गुण (९१.४०%)
बारावी (सायन्स) - पुणेकर रोहन — ६०० पैकी ४७५ गुण (७९.१७%)
बारावी (कॉमर्स) - पणीकर चेतन — ६०० पैकी ५३५ गुण (८९.१७%)
तसेच रितिका कोरे
सदर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेप्रती असलेली कृतज्ञता, शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व नमूद कले.
प्रमुख पाहुणे १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी व '१०वी तुकडी फ' या चित्रपटात मुख्याध्यापकाची भूमिका करणारे कलाकार यशोधन बाळ सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना जीवनातील यश-अपयशाचे समतोलपणे स्वागत करण्याचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, "समाजातून खूप काही शिकता येते. साधेपणातच खरी शिस्त व शिकवण असते."
कार्यक्रमाचे अध्यक्ष जय पुरोहित सरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, "सतत सराव करा, संकल्प करा आणि त्यावर चिकाटीने कार्य करा. यशाने हुरळून न जाता पुढील ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा."
त्यांनी चढाओढीच्या स्पर्धेत उतरायचं असेल, तर नेहमी सज्ज राहा हे सूत्र विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले.
समारंभास संस्थेचे सचिन अतुल कुलकर्णी सर, प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष व सहसचिव अजय पुरोहित सर, महामात्र श्री. निर्भय पिंपळे सर, मुख्याध्यापक. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका ज्योती खिरीड मॅडम, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी ,पालक, तसेच दहावी शिवनेरी वर्गाचे विद्यार्थी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी नलिनी पवार मॅडम यांनी वाचून दाखवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा वाडेकर मॅडम यांनी केले. आभारप्रदर्शन कांता इष्टे मॅडम यांनी केले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!