महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत दहीहंडीचा उत्साहपूर्ण सोहळा साजरा करण्यात आला. यावर्षी दहीहंडी उत्सवाला आगळावेगळा शैक्षणिक रंग देण्यात आला .विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक पुस्तकहंडी फोडून शिक्षण व ज्ञानाची गोडी जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान मुलांनी विविध गीते, नृत्य , घोषवाक्ये आणि पारंपारिक पोशाखातून उत्सवाला रंगत आणली.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. प्रतिभा गायकवाड आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सहभागाचे कौतुक केले .
शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते. पुस्तकहंडी फोडण्याच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संस्कारांसह शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.या उपक्रमातून मुलांना एकतेचे महत्त्व , शिक्षणाची गोडी आणि सहकाराचे बळ समजले .