शिक्षण विवेक सध्या वेगाने वाढणारा माहितीचा खजिना आहे. मला शिक्षण विवेकचा सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलीकडच्या काळात शिक्षण विवेकचा पुरोगामी त्याचप्रमाणे आधुनिक दृष्टीकोन वाढत असल्याचे पाहून मन आनंदित होते. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला जितक्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो तशाच या ही आहेत. मी पाच वर्षांपासून सक्रिय सदस्य या नात्याने काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून अनेक चांगल्या व्यक्तींशी परिचय सुद्धा झाले. सर्वांच्या सामूहिक योगदानातूनच हे काम हळूहळू पूर्णत्वाकडे जात राहिल.
ज्ञान समृद्ध करण्यात हातभार लावताना अभ्यासक म्हणून मीही समृद्ध होत गेलो. नवे विषय समजले, नवीन माणसे जोडली गेली. या व्यासपीठामुळे महाराष्ट्रातील विविध लोक संपर्कात आले. माझे जग विस्तारले. समाजाला ज्ञान मिळविण्यात सहकार्य करणारे हे माध्यम अधिक समृद्ध व्हावे अशी शुभेच्छा.! येथे प्रत्येक गोष्ट ही पारदर्शी आहे आणि ती सर्वाना समजते त्यामुळे काम करण्याचा मोकळेपणा जाणवतो हे याचे बलस्थान आहे. 'Assuming good faith.' हा विचार मी या निमित्ताने व्यक्तिगत आयुष्यातही वापरायला शिकलो ते इथूनच. हे व्यासपीठ अधिक समृद्ध व्हावे आणि अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा अशी आशा प्रकट करतो. वाढदिवसाला काही ना काही संकल्प करायचा असतो आणि तो पाळायचा प्रयत्नही करायचा असतो अस संस्कृती सांगते. आपण सर्वजण मिळून या व्यासपीठाची गुणवत्ता वाढविण्याचा सामूहिक प्रयत्न या औचित्याने करूया असे सुचवितो.
वर्धापन दिनाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.!
श्री. स्वप्निल नंदकुमार गोंजारी.
सहाय्यक शिक्षक.
म.ए.सो.चे कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती.