म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत नागपंचमीनिमित्त पालकांसाठी मेंदी स्पर्धेचे आयोजन

02 Aug 2025 16:23:33
 
म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत नागपंचमीनिमित्त पालकांसाठी मेंदी स्पर्धेचे आयोजन
म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत नागपंचमीनिमित्त पालकांसाठी मेंदी स्पर्धेचे आयोजन
 
म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत नागपंचमीच्या निमित्ताने पालकांसाठी मेंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत मोठ्या संख्येने पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविधरंगी मेंदीच्या सुंदर रचना पालकांनी साकारल्या. स्पर्धेत कलात्मकता आणि सृजनशीलतेला विशेष महत्त्व देण्यात आले होते.विजेत्या पालकांना शाळेतर्फे पारितोषिक दिले जाणार आहे. सर्व शिक्षकांनी या स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले. मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले .
Powered By Sangraha 9.0