म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत पालक झाले विद्यार्थी – आनंदात रंगली पालक शाळा!
म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत पालकांसाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. पालक शाळा या विशेष उपक्रमात पालकांनी विद्यार्थ्यांप्रमाणेच बाकावर बसून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. परिपाठ सादर केला. शाळेतील शैक्षणिक क्रिया, खेळ, गाणी, हस्तकला यामध्ये सहभागी होत पालकांनी मुलांच्या शालेय जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या उपक्रमामुळे पालकांना मुलांच्या शिक्षणातील आनंद, शाळेतील वातावरण आणि शिकण्याच्या पद्धती यांचा जवळून परिचय झाला. पालकांनी सांगितले की, “मुलांना रोज शाळेत येण्याचा का आनंद वाटतो, हे आज आम्हालाही कळाले.”
या उपक्रमामुळे पालक आणि शाळा यांच्यातील सुसंवाद अधिक मजबूत झाला आणि मुलांच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्नांची प्रेरणा मिळाली. पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत शाळेचे आभार मानले.
मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी सर्व पालकांचे व शिक्षकांचे कौतुक केले .