एन. ई. एम. एस. शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम साजरे झाले.

21 Aug 2025 17:05:52

एन. ई. एम. एस. शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम साजरे झाले.
 
शनिवार पेठेतील एन. ई. एम. एस. शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम साजरे झाले.
इयत्ता तिसरीतील सकाळ व दुपार दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या स्वच्छ भारत , स्वस्थ भारत उपक्रमावर आधारित नाटिका, भाषण, स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती, नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
स्वच्छ भारत ,स्वस्थ भारत उपक्रमावर आधारित नाटुकल्यामध्ये शाळेतील सेविका सौ. वैदेही खवळे यांनी विद्यार्थ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्री. हेमांगी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन तिसरीच्या वर्गशिक्षिका सौ. मनिषा पेठकर आणि सौ. सुवर्णा पवार यांनी केले. कला विभागाच्या शिक्षिका सौ. अपूर्वा अरगे आणि सौ.रुपाली कनोजे यांनी सजावट केली होते.
Powered By Sangraha 9.0