न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा!

21 Aug 2025 16:57:29

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत  ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा!
शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत  ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. माननीय मुख्याध्यापक अनिता भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालासमिती अध्यक्ष डॉ. शरद अगरखेडकर, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का हे सर्वजण उपस्थित होते.
आपल्या देशाची गौरवशाली परंपरा व उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य, घालून दिलेले नियम पाळावे आणि आपली शारीरिक क्षमता वाढवावी. आजचा वर्तमानकाळच विद्यार्थ्यांसाठी पुढील उज्ज्वल भविष्यकाळ ठरणार आहे, असा संदेश मुख्याध्यापकांनी यावेळी दिला.
'प्रियतम आमुचा नितांत सुंदर भारत देश महान' या समूहगीताचे गायन विद्यार्थ्यांनी यावेळी केले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली.
कलाशिक्षक अंजली मालुसरे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपल्या मातृभूमी बद्दलचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या चित्रांची स्पर्धा घेऊन त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन चित्रकला दालनामध्ये आयोजित केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी चित्रप्रदर्शनाला भेट दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले.
एनसीसी प्रमुख राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Powered By Sangraha 9.0