डी.ई.एस.चा ‘संस्थापक’ दिन उत्साहात साजरा!

22 Aug 2025 14:48:46

डी.ई.एस.चा ‘संस्थापक’ दिन उत्साहात साजरा!
पुणे: दिनांक ९ ऑगस्ट हा डी.ई.एस.सेकंडरी शाळेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा ‘संस्थापक दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कर्नल कपिल जोध, शाला समिती अध्यक्षा ॲडव्होकेट राजश्री ठकार, शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे,प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर,ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर, अभिजीत शिराळकर, मिलिंद संपगावकर, शिक्षक,शिक्षिका, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि संस्थापकांच्या प्रतिमेला हारार्पण करून झाली. हर्षदा कारेकर यांनी सरस्वती वंदना व संस्थापक दिन गीताचे सादरीकरण केले. यानंतर राजश्री ठकार यांच्या हस्ते कर्नल कपिल जोध यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विजया जोशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रेसी डिसूजा यांनी करून दिला. डी.ई.एस.संस्था व संस्थापकांची माहिती सायली सोमण यांनी दिली.
जोध यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यात त्यांनी जीवनात नेहमी मोठे ध्येय, परिश्रम, सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि आत्मविश्वास महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या वेळी शिक्षण विवेक मासिकाच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त कपिल जोध, राजश्री ठकार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षणविवेकच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षणविवेकच्या कार्याची माहिती राघवेंद्र गणेशपुरे यांनी दिली. यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकार व स्पर्धेत, पाचवी,सातवी व आठवी शिष्यवृत्ती तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या पहिल्या पाच मेरीट विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्मिता मेश्राम, सुप्रिया शेट्टी, नेहा वरखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या नावांचे यादी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ कानडे तर राधा केतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपात पल्लवी धिवार यांनी वंदे मातरम् गीत सादर केले.यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनात सर्वांनी परिश्रम घेतले.


राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई. एस. सेकंडरी शाळा, पुणे
Powered By Sangraha 9.0