आनंदाश्रम आयोजित विविध संस्कृत स्पर्धेतील रमणबाग प्रशालेचे घवघवीत यश

22 Aug 2025 14:33:38

आनंदाश्रम आयोजित विविध संस्कृत स्पर्धेतील रमणबाग प्रशालेचे घवघवीत यश
 
संस्कृतच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या आनंदाश्रम आयोजित विविध संस्कृत स्पर्धेतील रमणबाग प्रशालेने घवघवीत यश प्राप्त केले.
'मम श्रेष्ठतम:नायक:'या
संस्कृतनाट्याभिवाचन स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक प्राप्त केला.
यामध्ये वैयक्तिक पारितोषिके
सहावीतील अमोघ कुलकर्णी- प्रथम क्रमांक, दहावीतील प्रत्युष महामुनी-द्वितीय क्रमांक, नववीतील वरद धारणे- तृतीय क्रमांक , सातवीतील शार्दूल धारणे याने उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली.
संहितेतचे मूळ मराठी लेखन रवींद्र सातपुते यांचे होते.त्याचा संस्कृत अनुवाद वर्षा गानू यांनी केला.त्यांना संहिता निवड व संस्कृत अनुवादाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.यासाठी
संगीत संयोजन प्रशालेतील दहावीतील विद्यार्थी गौरव जगताप
याने केले.स्तोत्र पाठांतर स्पर्धेत पाचवीतील प्रेम दुसाने याने द्वितीय क्रमांक, सहावीतील स्वरुप शेवडे उत्तेजनार्थ,सातवीतील नकुल वाडेकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत नववीतील तेजस कवितके याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.सर्व स्पर्धेतील गटांमध्ये सहभागी होऊन
गुणवत्तापूर्ण यशाबद्दल प्रशालेस सांघिक द्वितीय पारितोषिक व ट्रॉफी प्राप्त झाली.
या संस्कृत स्पर्धेसाठी
प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी तसेच
संस्कृत शिक्षक वर्षा गानू, प्रज्ञा करडखेडकर, शितल चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0