एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात आगळावेगळा शिक्षक दिन साजरा

10 Sep 2025 16:49:47

एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात आगळावेगळा शिक्षक दिन साजरा 
दिनांक ४ सप्टेंबर २०२५
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स च्या प्राथमिक शाळेत आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज दिवसभर शाळा चालविली. यामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपाई काका पर्यंत आपापल्या कामाची जबाबदारी चोखपणे पार पडली. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही त्यांना अगदी मनापासून साथ दिली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने अतिशय सुंदर सुंदर भेट कार्ड बनवून आणले व शिक्षकांना सन्मानपूर्वक देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. संपूर्ण कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षक अर्चना गोरे ,डॉ. श्री. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सांस्कृतिक विभागाने केली. सुरेखा भामरे यांनी मुलांना शिक्षक दिनाची माहिती सांगितली. शुभांगी गवारी यांनी सूत्रसंचालन केले.
तसेच यावेळी पालक शिक्षक संघातर्फे गेली 35 वर्ष शैक्षणिक ज्ञानदानाचे काम करणाऱ्या तसेच सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेखा जाधव व तीस वर्षे सेवा झालेल्या अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे, अनिता येनगुल , समीक्षा इसवे, ज्योती भोसले , शहनाझ हेब्बाळकर आणि सीमा हांगे या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर
Powered By Sangraha 9.0