भारत विकास परिषदेच्या समूहगीत गायन स्पर्धेत डी.ई.एस.सेकंडरी शाळेला द्वितीय पारितोषिक

13 Sep 2025 15:44:08

दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी टिळक मार्गाजवळील गणेश सभागृहात भारत विकास परिषदेच्या दक्षिण प्रांताची समूहगीत गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत डी.ई.एस. सेकंडरी शाळेला द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत एकूण पंधरा शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे ऊर्मिला डांगे,प्राची पुरंदरे, स्नेहल नेवासकर यांनी परीक्षण केले. स्पर्धेत डी.ई.एस.सेकंडरी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘चेतना के स्वर’ या पुस्तकातील हिंदी व संस्कृत मधील दोन गीतांचे सादरीकरण केले. या गाण्यासाठी संगीत शिक्षिका भक्ती अमोघ पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यात एकूण ११ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सानवी कुलकर्णी, ज्ञानदा कुलकर्णी, मीरा बिडकर, सार्थक साळसकर, भार्गव गोडसे, भार्गवी पाटील, स्वरा कौलगुड, गार्गी निजमपूरकर यांनी गाण्याचे सादरीकरण केले.  यांनी वादनाची साथ दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, मेडल मिळाले. डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी यांनी संगीत शिक्षिका व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक, अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0