म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षकदिनानिमित्त 'पाटी दप्तरा शिवाय शाळा' या उपक्रमाचे आयोजन.

16 Sep 2025 12:27:26

म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षकदिनानिमित्त
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षकदिनानिमित्त 'पाटी दप्तरा शिवाय शाळा' या उपक्रमाचे आयोजन.
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा वेश परिधान करून वर्गात जाऊन अध्यापनाचा अनुभव घेतला. छोट्या-छोट्या शिक्षकांनी घेतलेले धडे पाहून सर्वत्र आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनण्याचा संदेशही देण्यात आला.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून ‘पाटी-दप्तराशिवाय शाळा’ राबविण्यात आली. पुस्तकांच्या ओझ्यातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांनी क्ले मातीपासून आकर्षक वस्तू तयार केल्या. पानांचा गणपती साकारला. रांगोळीने शाळेचा परिसर उजळून टाकला. रंग, आकार आणि सर्जनशीलतेच्या या मेजवानीत चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
शिक्षकदिनाचा हा उत्सव केवळ आनंदाचा नव्हे तर गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि महान शिक्षकांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा एक संस्मरणीय क्षण ठरला. भावे प्राथमिक शाळेत दिवसभर उत्साह, आनंद व सर्जनशीलतेची रंगतदार उधळण पाहायला मिळाली .
 
Powered By Sangraha 9.0