“एन. ई. एम. एस च्या विद्यार्थ्यांकडून पंतप्रधानांना ७५व्या वाढदिवसाच्या संस्कृत शुभेच्छा”

20 Sep 2025 15:19:12

“एन. ई. एम. एस च्या विद्यार्थ्यांकडून पंतप्रधानांना ७५व्या वाढदिवसाच्या संस्कृत शुभेच्छा”
एन. ई.एम. एस शाळेच्या इयत्ता ५वी ते ७वी च्या एकूण ३०० विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त संस्कृत भाषेत दीर्घायुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा पत्रातून दिल्या. संस्कृत शिक्षिका अनघा पोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या पत्रात “सत्यसंकल्पो बलवान्, राष्ट्रसेवकः तत्परः” असे मंगल विचार नोंदवले. पत्र तयार करताना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना संस्कृत लेखनाचे बारकावे शिकवले व भारतीय भाषांच्या जतनासाठी प्रेरणा दिली.
संस्कृत भाषेतून पत्र लिहिण्याचा पाठिंबा शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांच्या कडून मिळाला. तसेच शाळेतील सर्व शिक्षक या उपक्रमाला उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे संस्कृतप्रेम आणि राष्ट्राभिमानाची भावना वृद्धिंगत झाली.
तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
Powered By Sangraha 9.0