वेगवेगळ्या गॅजेट्सनी वेढलेल्या विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी इयत्ता नववीच्या 85 विद्यार्थ्यांची दि.13 सप्टेंबर 2025 रोजी क्षेत्रभेट वसुंधरा अभियान बाणेर येथे आयोजित करण्यात आली होती.
पाषाण आणि बाणेर मधील तुकाई टेकडीवर जाऊन विद्यार्थ्यांनी वसुंधरा अभियानच्या स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाने टेकडीवर वृक्षारोपण केले. तसेच तेथे असलेले निरुपयोगी गवत काढून टाकण्याचे काम केले. हे काम करत असताना विद्यार्थ्यांना जमिनीमध्ये वाढणाऱ्या विविध जीवजंतूंची ओळख झाली. तसेच निसर्गातील वैविध्याची ओळख झाली. टेकडीवरील वनराईत असलेला मुबलक ऑक्सिजनमुळे विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने श्रमदान केले.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रमा कुलकर्णी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वसुंधरा अभियानचे संस्थापक सदस्य माननीय श्री.भुजबळ सर यांचे मोलाचे सहाय्य लाभले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून जमवलेला निधी वसुंधरा अभियानाच्या कार्याला देणगी म्हणून सुपूर्द केला. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर सौ कविता चांदककर, रितू केळकर, नेहा फडके, श्री. अवधूत धायगुडे,श्री. ओंकार पवार हे शिक्षक सहभागी झाले होते.